Erotica वलय (कादंबरी)

Well-known member
2,067
4,946
143

वलय (कादंबरी)

barbara-palvin-squeeze.gif
barbara-palvin.gif
tit-squeeze.gif
barbara-palvin-hot.gif
 
Well-known member
2,067
4,946
143
लेखक:- निमिष सोनार

टिंग टाँग" ... दरवाज्याची बेल वाजते. सून दार उघडते. सासूच्या हातातील बाजाराच्या पिशव्या घेते. सासू सोफ्यावर पंख्याखाली बसून पदराने घाम पुसते. सून स्वयंपाकघरात जाते.
"सूनबाई, झाला नाही का स्वयंपाक अजून?" सोफ्यावरून आवाज स्वयंपाकघराकडे जातो.
पेपर वाचणारे सासरे पेपरातून डोके बाहेर काढून सासूकडे बघतात. पुन्हा पेपरात बघतात.
"हो, सासूबाई. तयार होतोच आहे स्वयंपाक!" स्वयंपाकघरातून आवाज सोफ्याकडे जातो.
"किती वेळा सांगितलं की या वेळेपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे, कळत नाही तुला?" सासू.
"एकदम टाइम टू टाइम सगळं करायला मी काही मशीन नाही सासूबाई!" मिरचीची फोडणी टाकत सून म्हणते. सगळ्यांना ठसका येतो.
"काय म्हणालीस? परत म्हण जरा! बघतेच तुला!", सोफ्यावरून उठत ठसका देत सासू म्हणते.
"आज तुला धडाच शिकवते!" असे म्हणून सासू त्वेषाने स्वयंपाकघरात जाऊन सुनेला जोरात तीन वेळा थप्पड लगावते. सासूच्या हाताचा धक्का लागून कढई पुन्हा पुन्हा तीन वेळा खाली पडते आणि तेल हवेत येऊन स्थिर होते! थ्रीडी कोनातून हवेतले तेल दाखवत कॅमेरा फिरत जातो.
सासरे उठून उभे राहतात. त्यांच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव! हे काय झाले? एकदम थप्पड? तीन वेळा ते खुर्ची वरून उठतात. मग त्यांचा चेहरा तीन वेळा ब्लॅक अँड व्हाईट होतो. तेही हवेत स्थिर होतात!!....
हा सीन मोठ्या पडद्यावर बघणारे निर्माते, कलाकार, लेखक, एडिटर वगैरे मंडळींनी टाळ्या वाजवल्या.
एडिटरने रिमोटने पॉज करून तो सीन तात्पुरता थांबवला.
एडिटर, "छान जमून आलाय हा सीन, नाही का?"
तेथे बसलेला एक कलाकार वैतागून म्हणाला, "एका क्रियेवरची प्रत्येकाची प्रतिक्रिया तीन तीन वेळा दाखवायची खरच गरज आहे का?"
डायरेक्टर म्हणाला, "अरे मग राजा! ते एकदम आवश्यक आहे! त्याशिवाय टाइमपास कसा होईल रे! ही काय दर आठवड्याला चालणारी सीरियल आहे का? पटापट कथा पुढे सरकायला? डेली सोप आहे हा! डेली सोप! अंगाला जसा डेली आपण सोप लावतो ना तसे. लोकांना रोज व्यसन लागलंय या डेली सोपचं! मग रोज रोज नवीन काय दाखवणार? थोडा टाईमपास हवा ना!"
निर्माता म्हणाला, "बरोबर आहे! चला एडिटर साहेब पुढे बघू द्या! करा पुढचा भाग प्ले!"
एडिटरने प्लेचे बटण दाबले.
"टिंग टाँग" ... पुन्हा बेल वाजते. थप्पड खाल्लेल्या सुनेचा पती ऑफिस मधून घरी येतो. घरात काय ड्रामा झालाय त्याचा अंदाज येऊन तो कुणाला काहीच न बोलता बेडरूम मध्ये निघून जातो. त्याची ब्रीफकेस ठेवतो, फ्रेश होतो, घरचे कपडे घालतो आणि मग बेडरूममध्ये जाऊन वाईन पीत बसतो. सीरियलचा एपिसोड संपतो. टाळ्या! टाळ्या!!
तेथे बसलेला तोच कलाकार पुन्हा दुपटीने वैतागून म्हणाला, "अरे अरे! टाळ्या काय वाजवताय? फॅमिली ड्रामा आहे हा आणि यात वाईन कसली दाखवताय? काय चाललंय काय तुमचं?"
डायरेक्टर म्हणाला, "वा वा! अगदी योग्य तेच दाखवतो आहे आपण! शेवटी पुरुषांना आवडणारं काहीतरी असलं पाहिजे ना यात? थोडेफार पुरुष प्रेक्षक लाभण्यासाठी असे करावे लागते! सासू सुनेच्या सिरीयल मध्ये पुरुष मंडळींचे नाहीतरी काही विशेष काम नसते. मग पुरुषांनी वाईन पीत बसायला काय हरकत आहे? आय मीन छोट्या पडद्यावर!"
तो कलाकार म्हणाला, "तुमचे लॉजिक चुकते आहे. पुरुषांना ऑफिसमधून घरी आल्यानंतर दारू पिण्याव्यतिरिक्त काही दुसरे काम नसते असे वाटले की काय तुम्हाला?"
डायरेक्टर म्हणाला, " आरे! गप बस ना यार! सोड ना त्या वाईनचा नाद! या सीरियलमध्ये लवकरच तुझी एन्ट्री होणार आहे! त्या सुनेच्या प्रियकराचा रोल करायचा आहे तुला! माहित आहे ना? हा वाईन पिणारा पती लवकरच घरातून पळून जातो असे दाखवायचे आहे!"
"काय? मला तर हे आधी माहिती नव्हते!", तो कलाकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
"हो! डेली सोपच्या कथेमध्ये मध्ये डेली बदल होत असतात आजकाल! वाचकांच्या सोशल मिडीयावरील प्रतिसादांवरून आणि TRP च्या आधारे! काय समजलास? याला आम्ही म्हणतो डेली 'सोप' विथ 'शांपू' तडका! ही ही ही ही!", डायरेक्टर स्वत:च्या जोकवर हसत म्हणाला.
इतर सगळे जबरदस्तीने हसले...
आज सर्वांनी त्या सिरीयलचे एकूण पुढचे सहा एपिसोड बघितले जे अजून टेलीकास्ट व्हायचे होते. गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये हे सर्व घडत होते आणि सीरियलचे नाव होते - "चार थापडा सासूच्या!"
त्या सिरीयलची कथा थोडक्यात अशी होती - सासू सुनेच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी नवरा घरातून पळून जातो खरं आणि एका बाबाच्या आश्रमात आश्रयाला जायचे ठरवून प्रवास करत असतांनाच सुनेच्या कॉलेज जीवनातील एक एकतर्फी प्रेमी त्याचे रस्त्यात अपहरण करतो आणि त्या घरात दूरचा नातेवाईक बनून येतो आणि राहतो. सुनेला नीट आठवत नसते म्हणून ती सुधा त्याला तो नातेवाईक समजते. मग तो सांगतो की मी त्याला शोधून आणतो पण मला सुनेची मदत लागेल. मग सुनेला संशय यायला लागतो वगैरे. मुलगा घरात नसल्याने सासू सुनेचे भांडणं बंद पडतात कारण दोघींनी भांडण करून करून ज्याला छळायचे तोच घरातून नाहीसा झाल्याने आता कुणासाठी भांडणार म्हणून सासू सुना गुण्या गोविंदाने राहायला लागलेल्या असतात. मग कथेत सूनेची बहिण अचानक प्रवेश करते आणि त्यामुळे आणखीन एक ट्वीस्ट येते आणि मग अनेक प्रसंगांनंतर गोड शेवट होतो.
 
Well-known member
2,067
4,946
143
आता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले.

राजेश टीव्ही सिरियल्ससाठी संपूर्ण ब्रॉड (विस्तारित) कथा लिहायचा. मग प्रत्येक एपिसोड्स साठी कथेनुसार स्वतंत्रपणे पुन्हा स्क्रीप्ट लिहायचा. तसेच तो फ्री लान्स फिल्म जर्नालीस्ट म्हणून सुद्धा काम करत होता. त्याने जर्नालिझमचा डिप्लोमा आणि सिनेमा लेखनासंदर्भात कोर्स केला होता. पण लेखनाची उर्मी आणि कला त्याच्या अंगी उपजतच होती. अगदी लहानपणापासून त्याने स्वतःमधली ही प्रतिभा ओळखली होती, पण एक दोनदा विश्वासघाताचे धक्के पचवून!

त्याचा टीव्ही आणि फिल्म जगतावरचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत असलेला ब्लॉग ("फिल्मी फायर") वाचणारे लाखो लोक होते. तो ब्लॉगवर जास्त करून फिल्म रिव्ह्यू (चित्रपट परिक्षण) लिहायचा. त्याचा रिव्ह्यू वाचून मगच चित्रपट बघायला जायचे की नाही हे ठरवणारी पब्लिक लाखोंमध्ये होती. त्याला टिव्ही सोबतच बॉलीवूड मध्ये ही लेखन करायची इच्छा होती. जमल्यास हॉलीवूड सुद्धा! मोठी स्वप्नं बघायला काय हरकत आहे असे त्याने मनाशी ठरवले होते. अजून बरीच मजल गाठायची बाकी होती. इतके काम करूनही ही तर अजून एका अर्थाने फक्त सुरुवातच होती. या क्षेत्रातल्या लेखकांसाठी आणि पत्रकारांसाठी काहीतरी भरीव काम आणि मदत करायची हे त्याने ठरवले होते आणि अर्थातच त्याच्या या महत्वाकांक्षेच्या मागे त्याचे एक महत्वाचे व्यक्तिगत कारणही जबाबदार होते!

राजेशने आज सुप्रियाच्या आवडीचा 'लाईट ग्रीन' तर सुप्रियाने राजेशच्या आवडीचा 'व्हाईट' पोशाख केला होता. पांढऱ्याशुभ्र कपड्यांत सुप्रिया राजेशला आवडायची आणि हिरवट कपड्यांत राजेश तिला आवडायचा. राजेश उजव्या हाताच्या मनगटात एक कडे घालायचा आणि उजव्या हातांच्या तर्जनीत डायमंड्सची व्हाईट अंगठी घालायचा. त्याची अंगकाठी साधारण पण आकर्षक होती. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही! राजेश बारीक मिशी ठेवत असे. त्याचे केस कुरळे होते. हसतांना राजेशच्या गालावर नेहमी खळी पडायची. त्याच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या स्मितहास्याची आणि गालावरील खळीची सुप्रिया जणू दिवाणीच झाली होती!

सुप्रियाचा चेहरा गोल होता आणि केस लांब होते. हसली की तिच्यासुद्धा गालावर खळी पडत असे. तिचा चेहरा भारतीय परंपरेनुसार रूढ असलेल्या अर्थाने सुंदर होता आणि शरीर पूर्णपणे प्रमाणबद्ध होते. पण एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व असे होते की तिला सोज्वळ किंवा घरेलू सून, आज्ञाधारक मुलगी किंवा साडीतली पत्नी अशाच भूमिका सीरियल मध्ये मिळायच्या. सध्या ती हीच एक मराठी सीरियल करत होती. बाकी दोन सिरियल्स संपल्या होत्या. पूर्वी तिने पुण्यात "सनम तू माझा" या नाटकात काम केले होते. ते नाटक चांगले यशस्वी झाले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी खुश होऊन तिला कार घेऊन दिली होती. तिचे वडील पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी व्यापारी होते. त्यांनी तिला तिच्या आवडीचे करियर करायला मोकळीक दिलेली होती. मग तिला पुढे मराठी चित्रपटात छोटे रोल्स आणि मग मराठी सिरियल्स मिळाल्या. मुंबईतील प्रसिद्ध "मॅडम अॅकॅडमी" मध्ये ती रीतसर कोर्सेस सुद्धा करत होतीच आणि आता तिचे हे शेवटचे वर्ष होते.

सुप्रिया राजेशवर प्रेम करत होती. तसे तिने त्याला बोलून दाखवले नव्हते पण तिला मनातून विश्वास होता की राजेशचेही तिच्यावर प्रेम आहेच आणि वेळ आली की ते ती व्यक्त करणार होतीच! राजेशबद्दल तिने घरच्यांना कल्पना दिली होती, पण एक मित्र म्हणून! दोघांना एकमेकांना भेटल्याशिवाय किंवा फोनवर बोलल्याशिवाय करमत नव्हते हे मात्र खरे! त्यापलीकडे ते अजून गेले नव्हते! सध्या तरी ते दोघे करियरवर लक्ष केंद्रित करत होते! सुप्रियाची राजेशशी या सीरियलच्या निमित्ताने ओळख झाली होती आणि नंतर अगदी कमी वेळेत त्याचे एका गाढ मैत्रीत रुपांतर झाले होते! सुप्रिया आणि राजेश बोरिवलीला राहत होते. राजेश एका अपार्टमेंट मध्ये भाड्याच्या रूमवर तर सुप्रिया हॉस्टेलवर!

सुप्रिया, "राजेश तू कसा जाणार घरी? मी सोडू का तुला साटमनगरला?"

राजेश, "नको, मला ड्राॅप केल्यावर तुला पुन्हा बरेच मागे सिद्धिविनायकनगरला यावे लागेल! मी जाईन आपला बसने नाहीतर टॅक्सीने!"

सुप्रिया, "नाही रे. चल. सोडते तुला. चल बस गाडीत!"

पाठीवरची सॅक मागच्या सीटवर टाकत राजेश सुप्रियाच्या बाजूला पुढे बसला. सुप्रियाने गाडी स्टार्ट केली. आता त्यांची गाडी ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर आली.

सुप्रिया, "तुला सहन कसं होतं रे हे सगळं? तू पूर्णपणे शांत बसून होतास सगळे एपिसोड बघताना! तू लिहितोस एक आणि ते त्यात बदल करून दाखवतात काहितरी दुसरेच?"

 
Well-known member
2,067
4,946
143
राजेश वैतागून म्हणाला, "नाही सहन होत हे सगळं मला! हे डेली सोप च्या नावाने हे जे चाल्लंय ना, ते नाही सहन होत, सुप्रिया! पण तरीही त्या सीरियलसाठी लेखन करतोय मी! मन मारून! कारण, या इंडस्ट्रीत लेखक म्हणून तसे पहिले तर ही माझी फक्त सुरुवात आहे असे मी मानतो कारण मला आजून बरीच मजल गाठायची आहे! आणि काही वेळेस मला चाॅईस नसणार आहे हे मला माहीत आहे. जे मिळेल त्यासाठी लेखन करावं लागणार आहे."

सुप्रिया, "हां. तेही खरंच आहे म्हणा. तुला सांगते आणि मी तरी काय करतेय? तेच करतेय! तेच नेहमीचे सुनेचे रोल! सुरुवातीला तडजोड करावीच लागते या क्षेत्रात. कोण कशाची आणि कशाशी तडजोड करेल हे मात्र सांगता येत नाही. नाही का?"

राजेश, "हां, पण एक नक्की! मी जी महत्त्वाकांक्षा बाळगून आहे, ती मी नक्की पूर्ण करणार. पण अजून वेळ लागेल त्याला हे मला माहिती आहे. येणारा काळच सांगेल ते! त्या महत्वाकांक्षेसाठी मी काहीही करायला तयार आहे!"

बराच वेळ ते बोलत होते. सुप्रियाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. तो नेमक्या कोणत्या महत्वाकांक्षेबद्द्ल बोलतोय हे सुप्रियाला नक्की माहित नव्हतं.

ती विचार करत होती, "याच्या मनात मी असेन का? हा माझ्यावर प्रेम करत असेल का?"

साटमनगर आल्यावर सुप्रिया म्हणाली, "आलं तुझं साटम नगर. चल बाय! काळजी घे."

सॅक पाठीवर घेऊन राजेश कारमधून उतरला. सुप्रियाला थँक्स म्हणून तो जायला निघाला. ती पुन्हा माघारी वळली.

राजेश त्याच्या "गीता अपार्टमेंट" जवळ पोचला आणि त्याने लेटर बाॅक्स चेक केला. त्यात काहीही नव्हते! मग लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट आली! त्यात ओळखीचे दोन जण होते. त्यांच्याशी 'हाय हॅलो' झाले. तो तिसऱ्या मजल्यावर राहत होता. एकटा. भाड्याने! तिसरा मजला आला. तो लिफ्ट मधून बाहेर आला. त्याचा फ्लॅट नं 309 चाबी ने उघडला. आत जाऊन फ्रेश झाला. मग सोफ्यावर बसला. बसल्या बसल्या त्याला थकव्याने झोप लागली!

त्याला रात्री नऊ वाजता जाग आली. त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून बाहेर बघितले. जेवणाचा डबा आलेला होता. डबा उचलून तो दार बंद करून आतमध्ये आला. टेबलावर पेपर आंथरून त्यावर त्याने डबा उघडला. भाजणीचे थालीपीठ, दही, रस्सा, कैरीचे लोणचे आणि खिचडी असा त्याचा आवडीचा मेनू त्याने मुद्दाम आज फोन करून बनवायला सांगितला होता. पाण्याची बाटली जवळ ठेवून तो थालीपीठ खाऊ लागला. फक्त रात्रीचा टिफिन त्याने लावला होता. दिवसा इतर ठिकाणी तो जेवण करून घ्यायचा. जेवण सुरू करता करता रिमोटने त्याने टीव्ही सुरु केला.

"बूम" या टीव्ही चॅनेलवर बॉलीवूड न्यूज सुरू होत्या! प्रसिद्ध इंग्रजी लेखक "केतन सहानी" यांची कथा असलेल्या "चार चतुर" या सुपरहिट हिंदी चित्रपटाच्या यशाची पार्टी सुरू होती. मात्र त्यात डायरेक्टर आणि लेखक यांची वादावादी सुरू झाली कारण, डायरेक्टरने लेखकाच्या कादंबरीवर चित्रपट बनवून सुद्धा त्याचे श्रेय लेखकाला चित्रपटातल्या श्रेयनामावलीत बिलकूल दिले नव्हते. उलट, लेखक म्हणून डायरेक्टरने स्वत:चे नाव दिले होते. दोन तीन वेळा फोनवर दाद न दिल्याने त्या लेखकाने पार्टीतच लोकांसमोर आणि पत्रकारांसमोर डायरेक्टरवर अचानक आरोप करण्याची संधी साधली. त्याच्या कादंबरीवर हा पहिलाच चित्रपट होता. जरी या डायरेक्टरने केतनला प्रथमच ब्रेक दिला होता याचा अर्थ त्याचे लेखनाचे क्रेडिट स्वत:कडे घेण्याची मुभा थोडेच त्याला प्राप्त झाली होती? पण कोणत्याही क्षेत्रातील प्रस्थापितांविरोधात नवोदितांना लढा देतांना खूप त्रास होतोच! राजेशने टीव्ही बंद केला. त्याचा मूड खराब झाला होता.

त्याच्या रुममध्ये त्याचे पुस्तकांचे एक मोठे कपाट होते. त्याला वाचनाची खूप आवड होती. त्या कपाटात राजेशचे लिखाण असलेली एक लाल रंगाची फाईल मुद्दाम सहज दिसेल अशी ठेवलेली होती. त्याकडे बघत तो विचार करू लागला - "या टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत लेखकांचे शोषण कधी थांबणार? मी यासाठी संघर्ष करणार आहे. नाकी नऊ आणणार मी सगळ्यांच्या! पण, थांबा लेकांनो! अजून योग्य वेळ आली नाही. एक दिवस माझा येईल आणि सगळ्या लेखकांचा सुद्धा! माझी गावाकडे जाण्याची वेळ पण लवकरच येईल असे दिसते आहे!"
 
Well-known member
2,067
4,946
143
सुप्रिया राजेशला ड्रॉप करून सिद्धिविनायकनगरला "लीएरा विमेन्स हॉस्टेल" वर पोहोचली. ते एक "सेल्फ कुकिंगची" सोय असलेले वर्किंग विमेन्स होस्टेल होते. तिच्या दोन रूममेट्स होत्या. सोनी बनकर आणि रागिणी राठोड. सुप्रियाने चावीने रूम उघडली. कॉमन किचन, हॉल आणि तीन स्वतंत्र बेडरूम, बाथरूम अशी रचना होती त्यांच्या रूमची! तिने आपली पर्स ड्रेसिंग टेबलवर ठेवली आणि आरशात पाहिले. चेहरा बराच काळवंडलेला वाटत होता. सोनी आली असेल असा विचार करून तिने सोनीच्या बेडरूमवर टकटक केले. आतून स्त्रीचा एक अवखळ आवाज आला, "कम ऑन इन सूप्री! डोअर इज ओपन!"

सुप्रियाने दरवाजा ढकलला तेव्हा सोनी बनकर तिच्या बेडवर अस्ताव्यस्त पाय फैलावून पहुडलेली होती. तिच्या कानात हेडफोन होता आणि अंगावर फक्त एक बारीक सफेद टी शर्ट आणि पँटी होती. सोनी बोलण्यात, वागण्यात आणि कपडे घालण्यात खूप अघळपघळ आणि मोकळी होती! सोनीचा चेहरा लांबूळका होता. तिची अंगकाठी भरीव आणि गोलसर होती. तिच्या चेहेऱ्यावर नेहमी एक बेपर्वाईची आणि उच्छृंखलतेची छटा असायची. डोळे चमकदार आणि बोलके होते. नाक सरळ आणि उठावदार होते.

"सोनी मॅडम, आराम चाल्लाय? जेवणाचं काय ठरवलंय आज रात्रीचं?"

"साकेत सोबत जाणार आहे मी बाहेर जेवायला."

"वा! मज्जा चाल्लीये मस्त. बाॅयफ्रेंड सोबत! अगं, रागिणी आली नाही अजून?"

सोनी हसायला लागली, "ती? आजपर्यंत आलीय का कधी वेळेवर ती परत? भटकत असते ती इकडे तिकडे रात्री बेरात्री! पण आज रात्री कसलीतरी शूटिंग आहे म्हणाली होती ती, त्यामुळे उशिरा घरी येईल ती!"

"शूटिंग आहे तेही खरंच आहे म्हणा! पण एरवी शूटिंग नसली तरी ही पोरगी रात्रीची बाहेर फिरतच असते. काय करत असते देव जाणे! एनिवे! मी राईस बनवते आहे. मग फक्त माझ्या एकटीसाठीच बनवते!"

"बिंदास बनव आणि खा! आपलंच हॉस्टेल आहे. आपलीच रूम आहे. आपलंच राज्य आहे! एंजाॅय!"

तेवढ्यात सोनीचा मोबाईल वाजला. ती बोलू लागली, "हां रे साकेत. आ रही हूँ! .. तैय्यार तो होने दे मुझे!...हां बाबा हां, तेरी पसंद का पिंक कलर पहन के आती हूँ . क्या? खाना खाने के बाद पब मे भी चलना है? ठिक है...सेक्सी कपडे पहनके आती हूँ..हां रे! कम कपडे पहनने है, तो तैय्यार होने में ज्यादा समय लगता है! तुम साले जेन्ट्स लोग इस बात को नही समझोगे!", एक डोळा मिचकावत स्वतःच्या जोकवर ती हसली.

तीच्या बेडरूम मधून बाहेर निघत सुप्रिया मनात म्हणाली, "त्या रागिणीला नावे ठेवते आणि स्वतः सुद्धा हुंदडते ही रात्री बेरात्री! पण ही सोनी भलती डान्स वेडी आहे. नाचण्याचा कोणताच चान्स, कोणतीच संधी ती सोडत नाही. डान्सबद्दल एवढं क्रेझी आजपर्यंत मी कुणाला पाहीलं नाही. ओह गॉड! आता सुद्धा चालली आहे ती पबमध्ये मनसोक्त डान्स करायला!"

फक्त एकदाच ती सोनी बरोबर पब मध्ये गेली होती तेव्हा तिने सोनीचा नाचण्याचा अजब फॉर्म आणि धिंगाणा बघितला होता! तिच्यासारखे खचितच कुणी नाचू शकत असेल! काय ती जबरदस्त एनर्जी होती आणि काय मस्त सॉलिड चार्म तिच्या नाचण्यातून ओसंडून वाहात होता की विचारता सोय नाही! फक्त एकच प्रोब्लेम होता- सोनी थोडीशी अल्लड होती!

सोनी महाराष्ट्रातल्या छोट्या शहरातून मुंबईत आली होती. तिला नृत्याची आणि संगीताची खूप आवड! अगदी स्वतः पेक्षा जास्त ती डान्सवर प्रेम करत असे. तिच्या मते डान्स म्हणजे एक प्रकारचा उत्कट अभिनयच आहे. नृत्य आपले शरिर आणि मन खर्या अर्थाने एकत्र आणते. त्यामुळे एखादा अभिनय रस नृत्याद्वारे आपण अधिक परिणामकारक पद्धतीने प्रेक्षकांसमोर पेश करू शकतो. करियरची सुरूवात म्हणून तिने टीव्हीवरच्या अनेक रियालिटी डान्स शो मध्ये भाग घेतला होता. अजून पुढे बरीच मजल गाठायची होती. मेकप करून, कपडे बदलून सुप्रियाला बाय करून सोनी निघून गेली. जेवण झाल्यावर सुप्रिया रूम मध्ये एकटीच होती. रात्री दहा वाजता थोडे फिरून आल्यावर ती परत आली. सुप्रिया झोपल्यावर रात्री एक वाजता सोनी परतली
 
Well-known member
2,067
4,946
143
सकाळी चार वाजता रागिणी राठोड परतली. तीच्या बेडरूममध्ये गेली. मग आंघोळ करुन पाच वाजता झोपली. सकाळी 9 वाजता सुप्रिया आणि सोनी निघून गेल्या तेव्हा रागिणी झोपलेलीच होती. सकाळी साडेअकराला तिला जाग आली. काल रात्री तिचे हॉरर सीरियलचे शूटिंग होते. गोराई बीचवर एका भीतिदायक वाटणाऱ्या एका जागेत डायरेक्टरने शूटिंग ठेवली होती. शूटिंग उशिरा रात्रीपर्यंत चालली होती. सध्या ती दोन हिंदी हॉरर सीरियल्स आणि दोन रियालिटी शोज मध्ये काम करत होती. सध्याचा काळ असा होता की टीव्हीचे प्रेक्षक वाढले होते आणि चित्रपटांसाठी वापरण्यात येणाऱ्या जवळपास सर्व आधुनिक टेक्नॉलॉजी सीरियलसाठी सुद्धा वापरायला सुरुवात झाली होती. सीरियलचे प्रोड्युसर आणि डायरेक्टरसुद्धा सीरियल चित्रपटाइतकीच भव्यदिव्य झाली पाहिजे असे पाहत आणि नंतर त्यातून बक्कळ पैसा कमावत!

सोनी, रागिणी आणि सुप्रिया तिन्ही माटुंगा येथे असलेल्या "मुंबई अॅकॅडमी ऑफ डान्स, ॲक्टींग अँड म्युझिक (MADAM)" येथे शिकत होत्या. जुन्या जमान्यातील प्रसिद्ध सुपरस्टार "स्वर्गीय धर्मेश कपूर" यांनी या कॉलेजची स्थापना केली होती. या कॉलेजला सगळेजण शाॅर्ट नावाने MADAM (मॅडम) कॉलेज किंवा "मॅडम अॅकॅडमी" म्हणत असत. तिघींचे या कॉलेजातले हे शेवटचे वर्ष होते. शेवटच्या वर्षी रोज काॅलेजला येणे बंधनकारक नव्हते. मात्र ठराविक दिवशी त्यांना हजर रहावे लागे. हे वर्ष संपले की त्यानंतर मग खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती त्यांच्या फिल्मी करियरची! शेवटच्या वर्षी काही असाईनमेंट मिळायच्या त्या आपल्या वेळेनुसार कम्प्लीट केल्या की कोर्सचे सर्टिफिकेट मिळत असे म्हणजे मग कुठेही अभिनय क्षेत्रात करियर करायला मोकळे!

शिकता शिकता पार्ट टाइम जॉब त्यांनी स्वीकारला होता. मुंबई सारख्या शहरात रहायचे म्हणजे अफाट खर्च आलाच! मग मिळेल ते आणि मिळेल तेव्हा पार्ट टाईम काम करण्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. मग तो याच क्षेत्रातला छोटा मोठा पार्ट टाईम जॉब असेल तर त्याहून चांगली गोष्ट कोणती? एक मात्र खरे की तिघींना फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव, पैसा आणि प्रसिद्धी कमावायची होती. या कॉलेजमध्ये मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनेक युवक युवतींसाठी साठी विविध प्रकारचे शाॅर्ट आणि फुल टाइम कोर्सेस होते.

अभिनय, नृत्य किंवा कोणतीही कला ही काहींना उपजतच प्राप्त झालेली असते. गरज असते ती फक्त ती कला आपल्यात आहे हे ओळखण्याची आणि "मॅडम अॅकॅडमी" सारख्या संस्था या उपजत कलागुणांना आणखी वाढवण्यासाठी मदत करतात! जंगली प्राण्याला आपण पाळीव बनवतो तसे त्या उपजत कलेला पाळीव बनवण्यासाठी असे कॉलेजेस आणि कोर्सेस कामी येतात. तसेच आज मनोरंजन क्षेत्रात काय चाललंय हे माहित करून घ्यायला असे रीतसर शिक्षण घेतलेले बरे असते पण घेतलेच पाहिजे असे काही नाही. तसेच उपजत अभिनय कलेसोबत जर देखणं आणि उठावदार व्यक्तिमत्व लाभलं असेल तर तो दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा!

लवकरच "मॅडम अॅकॅडमी" मध्ये एक ऑडिशन होणार होते ज्याची त्या अॅकॅडमी मधील सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. हॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्या एकत्र प्रयत्नातून एक भव्यदिव्य चित्रपट तयार होणार होता. त्याची भारतीय पातळीवरील एकमेव भव्य ऑडिशन "मॅडम" मध्ये टप्प्याटप्प्याने होणार होती. त्यांना त्यासाठी जास्त प्रसिद्ध नसलेले पण चांगले जातीचे अॅक्टर हवे होते जे त्यांना भरपूर वेळ देऊ शकतील. हा चित्रपट एक अतिशय अभूतपूर्व आणि मोठा असणार होता ज्याची कथा काय असेल हे अजूनपर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. अॅकॅडमी मधले जवळपास सगळेजण त्यासाठी उत्सुक होते. अजून ऑडिशनची तारीख जाहीर झालेली नव्हती.
 
Well-known member
2,067
4,946
143
वलय - प्रकरण ४

एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम "राजमा चावल" खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता.

पलीकडून आवाज आला, "जानू, पहचाना मुझे?"

तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.

"क क कौन? रा राहुल गुप्ता?" घाबरत रागिणी बोलली.

"अरे वा! ठिक पहचान लिया तूने! लेकीन पहचानने में इतना समय लगा कमिनी तुझे? सहर में जाकर भूल गयी तेरे अशिक को?", तो आवाज उद्धट वाटत होता.

"सबसे बडा कमिना तो तू है नालायक! मेरा नंबर कहाँ से मिला तुझे?" रागिणीही काही कमी नव्हती.

"वो सब छोड और सुन! मुझे पचास हजार रूपिया दे दे, नही तो मै तेरा नंबर तेरे हजबंड को दे दूँगा और तेरे बारे में सबकुछ बता दूँगा!"

रागिणी आता घाबरली. फोन तिच्या मूळ शहरातून म्हणजे दिल्लीहून होता. या माणसाला आता पैसे देण्यावाचून पर्याय नव्हता. नंतर त्याला बघता येईल. आता त्याच्याशी उलझण्याइतका तिच्याकडे वेळ, मानसिकता आणि उत्साह नव्हता. मात्र या माणसाची मजल पैसे मागण्यापर्यंत जाईल असे तिला वाटले नव्हते. पण सध्या त्याला चूप करणे तिला आवश्यक होते. पोलिसांकडे जायचे की नाही तसेच सुप्रिया आणि सोनीला हे सांगायचे की नाही किंवा तिचा मुंबईतील बॉयफ्रेंड सूरजला याबाबत सांगायचे की नाही हे ती नंतर ठरवणार होती. आता आवश्यक होते या माणसाला पैसे देऊन चूप करणे!

"बता साले हरामी तेरा अकाउंट नंबर!! आधे घंटे मे भेजती हूँ पैसा, लेकीन तेरा सडा हुआ मूँह बंद रखना!" ती ओरडली.

"अब आ गयी छोरी लाईन पे!" तो जिंकल्याच्या आविर्भावात म्हणाला.

फोन ठेवल्यानंतर ती स्वत:वर चिडली. पूर्वी केलेल्या काही चूका आता तिच्यासमोर अडथळे बनून येत होत्या. तिला भूतकाळाची ती आठवण नकोशी होती पण, काही ना काही कारणाने तो भूतकाळ तिच्या वर्तमानकाळात परत परत शिरून भविष्यकाळाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्या भविष्यकाळातील स्वप्नांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. आता लगेच त्या गोष्टीवर विचार करून दिवस खराब करायची गरज नाही असे तिने ठरवले. टेबलावरचा राजमा चावल थंड झाला होता. तिने राजमा पुन्हा ओव्हन मध्ये गरम केला, तो पुन्हा भातावर टाकला आणि शांततेने जेवण केले. आज रात्री तिच्या नंतर हॉरर सिरीयलचे शूटिंग होते. आता दुपारी झोप घेणे आवश्यक होते. रागिणीला आपली मुंबईतील मैत्रीण आणि पूर्वीची रुम पार्टनर गौरी हिची आठवण आली, जी सध्या कॅनडात होती आणि तेथेच सेटल झाली होती. तिच्याशी थोडावेळ ती फोनवर बोलली आणि मग बेडवर गेली. तिच्याशी बोलल्यावर तिला हायसे वाटले आणि ताण हलका झाला.

मग रात्रीच्या शुटिंगसाठी तिला मिळालेली स्क्रिप्ट ती वाचत बसली. ती ज्या हॉरर सिरियलमध्ये काम करत होती त्याची थोडक्यात कथा अशी होती - "एका खेडेगावातील मैत्रिणीकडे शहरातील तीन मैत्रिणी येतात आणि त्या चौघी दोन स्कूटीवरून गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जवळच्या छोट्या जंगलात सहलीसाठी जातात. तेथे जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात त्या जेवण बनवणार असतात आणि दिवसभर मजा करणार असतात. सोबत त्या ब्लूटूथ स्पीकर घेऊन आलेल्या असतात. मोबाईलमधली गाणी त्या स्पीकरवर लावली जातात. जवळच एक नदी आणि छोटीशी जुन्या काळातील पडीक गुहा असते. गम्मत म्हणून एक जणी त्या गुहेत शिरते आणि बराच वेळ झाला तरी परत येत नाही म्हणून एकेक करून तिला शोधायला गुहेत शिरतात. शेवटी चौथी एकटीच गुहेच्या बाहेर उरलेली असते. ती सुद्धा हिम्मत करून आतमध्ये जाते आणि?"

या पुढची कथा अजून रागिणीला सुद्धा माहिती नव्हती. आजकाल इन्टरनेटच्या जमान्यात कथांची चोरी होत असल्याने आणि कथाबीज किंवा कथेचा शेवट चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने एका ठराविक मर्यादेपर्यंतच आणि टप्प्या टप्प्याने कथा कलाकारांना माहित होत होती. हेच सिनेमा बनवतांना सुद्धा पाळले जाऊ लागले होते.

(क्रमशः)
 
Well-known member
2,067
4,946
143
वलय - प्रकरण ५

थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.

स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...

... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.

रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...

तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!

दिल्लीतल्या मॉडर्न कॉलेजमधले त्या दोघांचे मॉडर्न प्रेम!

आणि तिला आठवला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तिच्या कॉलेजातला राहुल गुप्ता ज्याचा आता फोन आला होता.

रोहन आणि तिने एकत्र पाहिलेली स्वप्ने!

तिला कॉलेज जीवनापासूनच अॅक्टींगचे वेड होते...

दृष्ट लागेल असे जन्मजात सौंदर्य तिला लाभलेले होते आणि ते तिने तरुणपणी आवडीने जपले आणि टिकवले आणि वाढवले होते.

तिचे व्यक्तिमत्व सुद्धा सळसळते आणि उत्साही होते, म्हणून ते सौंदर्य आणखी खुलून दिसायचे.

तिचा चेहरा खूपच बोलका होता.

मनातील अगदी कोणतीही भावना तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसून यायची. तिचा चेहेरा लगेच लालसर व्हायचा.

त्यात भर म्हणून तिला अभिनय करण्याची आवड होती. कॉलेजात अनेक नाटकांतून तिने भाग घेऊन वाहवा मिळवली होती. कॉलेज संपले की तिला मुंबईला यायचे होते. थोडक्यात तिचे अभिनय क्षेत्रातले भविष्य उज्वल होते हे नक्की!

रोहनने तिला तिच्या करियर निवडीची मोकळीक दिली होती. त्याला लंडन मध्ये MBA करून नंतर मॅनेजमेंट मध्ये करियर करायचे होते.

तिचे वडिल दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्तुळात उठबस असणारे श्रीमंत बिझिनेसमॅन आणि रोहन एका प्रायव्हेट कॉलेज मधल्या प्रोफेसरचा मुलगा!

रागिणीच्या घरच्यांचा तिच्या रोहन सोबतच्या संबंधांना विरोध होता. पण, दोघेही हे ठरवून चुकले होते की रोहनने रागिणीच्या घरच्यांचे मन जिंकायचे आणि मग रागिणीने त्यांचे मन वळवायचे....

पण बरेचदा आपण ठरवतो एक आणि होते काही दुसरेच!

कारण फीलगुड सिनेमांच्या कथांमध्येच फक्त असे घडत असते की एखादा प्रियकर प्रेयसीच्या घरात काही कारणाने प्रवेश मिळवून हळूहळू आपल्या स्वभावाने सगळ्यांची मने जिंकतो.... पण रागिणीला विश्वास होता की रोहन असे नक्की करेल. खऱ्या जीवनात असे तो करून दाखवेन.. त्यांनी दोघांनी त्या दृष्टीकोनातून तयारी पण सुरु केली.

त्यासाठी त्यांनी "मेरा पिया गया परदेस!", "बहू परदेसी!", "मेरी दुल्हनिया गयी है सात समुंदर पार!" असे टिपिकल सुपरहीट पिक्चर पण पहिले आणि खऱ्या जीवनाशी तुलना करून ते दोघे हसत राहिले.. असे होईल तसे होईल अशी स्वपने रंगवत राहिले, पण कुणालातरी या त्या दोघांच्या या सर्व प्लानिंगची खबर मिळाली होती हे मात्र नक्की!

आणि मग ...

त्या रात्री छोट्या रस्त्यावरून हायवेवरील चौकात नेहमीच्या वेगात वळतांना अचानक प्रकट झाल्यासारखा तो ट्रक उजव्या बाजूने त्यांच्या कारसमोर आला...
रोहन कार चालवत होता. बरोबर कारच्या पुढे उजव्या बाजूला त्याच्या सीटला ट्रकची जोरदार धडक बसली. जोरकस धडकेने रोहन जागीच ठार झाला. त्या धडकेने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूचा दरवाजा उघडून रागिणी खाली पडली पण तिला थोडेसे खरचटले.

तोपर्यंत ट्रक वेगाने निघून गेला. पण जवळच पोलीस गस्त असल्याने ट्रक ड्रायव्हरला पकडण्यात यश आले.

ट्रक ड्रायव्हर रामसिंग यादवला पकडून नंतर सोडून देण्यात आले होते कारण त्याने मुद्दाम धडक दिल्याचा किंवा ट्राफीक नियम तोडल्याचा असा कुठलाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा सीसीटिव्ही मध्ये दिसत नव्हता. तो एक अपघात असल्याचेच सिद्ध झाले, घातपात नाही. रागिणीला पुसटसा घातपाताचा संशय आला होता पण तिच्याकडे कोणताही ठाम पुरावा नव्हता...

पण तो अॅक्सिडेंट मात्र तिच्या जीवनाला वेगळ्याच वळणावर घेऊन आला. नंतर ती भयंकर निराश होऊन डिप्रेशनमध्ये गेली... त्यातच तिच्याकडून एक चूक घडली आणि मग क्रमाने अनेक गोष्टी चुकत गेल्या जसे ...

तिला पुढचे आठवणार एवढ्यात सूरजच्या फोनने तिची विचारयात्रा भंग पावली. स्वतःला सावरून आवाजामधला रडवेला अंश गिळून ती नेहमीच्या सहजतेने सूरजला म्हणाली, "हां, सूरज बोल ना. कैसा है तू? कब आया?"

नंतर बराच वेळ ती सूरजशी बोलत होती. सूरज एक महिना ब्राझिलला जाऊन परतला होता. बिझिनेसच्या निमित्ताने त्याच्या अनेक परदेश वाऱ्या नेहमी व्हायच्या. त्यापैकीच ही एक वारी संपवून तो परतला होता.

त्याचेशी बोलताना तिला थोडे हायसे वाटले. या अफाट पसरलेल्या शहरात पैसा कमावण्यासाठी यांत्रिकपणे घड्याळाच्या काट्यांनुसार धावणाऱ्या आणि जगणाऱ्या असंख्य माणसांच्या महापूरात तिला त्याचा नेहमी आधार वाटत होता...
 
Well-known member
2,067
4,946
143
वलय - प्रकरण ६

एके दिवशी "चार थापडा सासूच्या" साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.

लिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते. उद्याच निघायचे होते..

पण सकाळी सात वाजता उठल्यावर अनपेक्षितपणे सुप्रियाचा फोन आला...

"तू आज येणार आहेस स्टुडिओत?", सुप्रिया विचारू लागली.

"नाही सुप्रिया! मला जरा गावी जावं लागतंय. काम आहे!", त्याने सुप्रियाला गावी जाण्याबद्दल आधी सांगीतले नव्हते.

"राजेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे!", सुप्रिया गंभीर होत म्हणाली.

"महत्वाचा विषय? कोणता?"

"आपल्या दोघांच्या आयुष्याबद्दलचा!"

"सुप्रिया, तुला नेमकं काय म्हणायचं आहे?"

"जरा स्पष्टच सांगते."

"थांब सुप्रिया! फोनवर नको!"

"मग कुठे?"

"केपलर्स कॅफे मध्ये भेट!"

"किती वाजता?"

"दहाला ये. तिथेच नाश्ता करू!"

केपलर्स कॅफे. एका कोपऱ्यातल्या टेबलावर दोन्ही बसले. दोघांनी व्हेज ग्रिल सँडविच मागवले.

सोबत कॅपुचिनो कॉफी.

"राजेश, मी सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालते. आपण लग्न करायचं का?"

"सुप्रिया, खरं सांगू? मला या प्रश्नाचं उत्तर आत्ता सांगता येणार नाही"

"का सांगता येणार नाही राजेश?", सुप्रियाला राजेशच्या अशा या पावित्र्याचे आश्चर्य वाटले.

"मला अजून बरीच मजल गाठायची आहे. माझे क्षेत्र अस्थिर आहे. बेभरवशाचं आहे. इन्कम मध्ये सातत्य नाही. मुंबई सारख्या शहरात आपल्याला परवडणार नाही!"

"हे तू बोलतो आहेस राजेश? तू? मी म्हणते की तू एकटाच कशाला घेतोस आपल्या दोघांची जबाबदारी? मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला? माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता!"

"अगं तू समजूतदार आहेस. पण माझे काय? मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं!"

"राजेश, मला कल्पना आहे या सगळ्यांची! पण मला ते सगळं मान्य असेल!"

"हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत!"

"राजेश, मनापासून ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण! आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू!"

"मी मानतो की आपण दोघेही महत्वाकांक्षी आहोत, मेहनती आहोत. पण, पुढचा काळ कुणी पाहिलाय?", असे म्हणतांना राजेशने नजर इकडे तिकडे वळवली.

"मग काय करायचे? मी माझ्या आई बाबांच्या म्हणण्यानुसार लवकरच अॅरेंज मॅरेज करून टाकू का?", तीचा स्वर थोडा रडवेला वाटत होता पण सावरून तिने स्पष्टच विचारले. पण सोबतच राजेशच्या रोखठोक आणि स्पष्टपणाचे मनातून तिला कौतुकही वाटत होते. तोच स्पष्टपणा तिने त्याच्यावरून वापरून पहिला.

"हाच तुझा मनमोकळेणा मला भावतो रे, राजेश मला!" ती मनात म्हणाली.

"मला वाटते होय. तू मार्गी लाग. माझ्यासाठी नको थांबूस!" राजेशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि सरळ सांगून टाकले.

"राजेश, परत एकदा विचार कर. आपण एक दोन वर्षे थांबूया का?", तिने त्याचे हात तिच्या चेहऱ्यापासून दूर केले.

"एक दोन वर्षे?"

"मला म्हणायचंय की एकमेकांना ओळखायला आपण आणखी वेळ देऊया का?"

"सुप्रिया, हे बघ! एकमेकांना ओळखायला दोन महिने सुद्धा पुरतात किंवा कधीकधी चार वर्षे सुद्धा पुरत नाहीत. मी तुझे आयुष्य माझ्या महत्वाकांक्षेसाठी धोक्यात घालू इच्छित नाही!" राजेश स्पष्ट म्हणाला.

"महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असते राजेश! पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस! तुझ्या मनात कुणी दुसरी तर नाही ना? सांगून टाक! " ती खूप भावूक झाली.

"नाही सुप्रिया. दुसरी कुणीही नाही!"

"मग असे का करतोयस राजेश तू?"

"हे बघ! तू मला आवडतेस सुप्रिया!! पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया! तसा मी अजून विचार केलेला नाही." त्याचेही डोळे पाणावले.

"ठिक आहे. मान्य आहे! तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे!", प्रॅक्टिकल विचार करून तिने स्वतःला सावरले आणि सांगून टाकले.

ती पुढे म्हणाली, "पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत.
नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल!" पण असे म्हणताना मनात एकीकडे तिला असंख्य वेदना झाल्या.

"मान्य आहे मला!" तो मनापासून म्हणाला, "आपली मैत्री कायम राहील. यापुढे सुद्धा! आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील!"

"ठिक आहे राजेश. चल निघते मी. उशीर होतोय!" सुप्रिया टेबलावरून उठत म्हणाली.

सुप्रियाने बिल दिले आणि तिच्या कारने निघून गेली. ती हुंदके देत होती. आपले मन आणि हृदयाचे विश्व उलटेपालटे झाल्यासारखे तिला वाटले.

राजेश सुद्धा आपल्या मार्गी चालता झाला. त्याचे डोळे सुद्धा रडून लाल झाले होते...

तो मनात म्हणत होता, "सुप्रिया, असे काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तुला काही गोष्टी माहित नाहीत. काही बंधने आहेत माझ्यावर! समजा मी ते तोडेनसुद्धा! तूही आहेसच माझ्या मनात! पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया! माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी! योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच!
 
Well-known member
2,067
4,946
143
वलय - प्रकरण ७

सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते.

त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती.

सोनी बनकर आज रूमवर एकटी होती. पुढचे चार दिवस तिचे कोणतेच शूटींग नव्हते. मग त्यानंतर तिने भाग घेतलेल्या डान्स शोचे ("हिंमत है तो नाच जरा!") फायनल एपिसोड्सचे शूटिंग असणार होते. त्यात तिला अर्थातच विनर बनायचे होते.

आज ती रिलॅक्स होती. तिने हात डोक्यावर ताणून एक मस्त आणि मोठा आळस दिला. जांभई दिली. मग मस्त चहा बनवला आणि पिला.

मनाशी गाणे गुणगुणत आणि नाचण्याच्या आविर्भावात हातपाय हलवत तिने तिचा शॉर्ट स्कर्ट काढून बेडवर टाकला. मग ती तिच्या बाथरूममध्ये गेली. सोबत असलेला मोबाईल बाजूला काचेवर साबणाच्या बाजूला ठेवला. मग टी शर्ट काढून टाकला. आता तिच्या अंगावर फक्त काळ्या रंगाची जाळीदार ब्रा होती. बाथरूम मधल्या आरशात तिने ब्राच्या आतमधले स्वतःचे दोन भरीव गोल न्याहाळले आणि स्वतःलाच आरशात एक शीळ मारली. थोडा शॉवर चालू केला आणि बंद केला. आता ती बरीच ओली झाली होती. पाण्याचे थेंब तिच्या अर्धनग्न शरीरावर, छातीवर जमा झाले होते.

"सोनी मॅडम, वा! झकास सेक्सी दिसताय तुम्ही आज!" असे म्हणून तिने मोबाईल उचलला आणि एक कमरेवरचा पूर्ण सेल्फी काढला. मग तो तिने फ्रेन्डबुक आणि फोटोग्राम या सोशल साईट्सवर अपलोड केला.

त्या फोटोखाली लिहिले - "गेटिंग रेडी फॉर द फायनल शो! यो !!" मोबाईल ठेवून दिला आणि ब्रा काढून फेकली. मग शॉवर चालू करून गाणे म्हणत ती मनसोक्त आंघोळ करू लागली.

"आता बघाच सोनी मॅडम, सोशल मेडियावरचे तुमचे फॅन किती वाढतील बघा फटाफट!"

तिला सोशल मेडियावर काहीही करून तिच्या फॅन्सची संख्या वाढवायची होती. खूप प्रसिद्धी मिळवायची होती. तिला नृत्यासोबतच प्रसिद्धीच्या वलयाची खूप इच्छा होती.

"पूर्ण जगाने मला ओळखले पाहिजे. पूर्ण जगाने माझा डान्स बघितला पाहिजे. जगाला माझ्या तालावर मला डोलवायचं आणि नाचवायचं आहे. डान्स म्हटलं की पहिल्यांदा सोनीच आठवली पाहिजे लोकांना! माझा डान्स शो शेवटच्या टप्प्यात आहे. कसेही करून मला माझा फॅन बेस वाढवायचा आणि जास्त प्रेक्षकांची वोट्स (मतं) मलाच मिळाली पाहिजेत! आता ज्यांना डान्स मधलं ओ की ठो कळत नाही ते प्रेक्षक काय पाहून मत देणार, हे मला माहीत आहे. कमॉन सोनी! कमॉन!" शॉवर घेता घेता ती स्वत:शी बोलत होती.

आंघोळ संपल्यावर गुणगुणतच ती बाथरूमच्या बाहेर आली. हात पुसल्यानंतर लगेच फ्रेंडबुक, फोटोग्राम चेक केले. फक्त वीस मिनिटांतच तिला चारशे लाईक्स आणि शंभरच्या वर कमेंट्स आल्या होत्या. तिच्या पेजला लाईक करणाऱ्यांची संख्या पाच हजारावरून साडेपाच हजार झाली होती.

"जुग जुग जियो मेरे फ्रेंडबुक भैय्या और फोटोग्राम जिजाजी!", असे म्हणून तिने आनंदाने मोबाईलच्या स्क्रीनची पप्पी घेतली.

दोनच दिवसात सगळीकडे आणि जागोजागी तिचा सेल्फी फॉरवर्ड होऊ लागला. जो कुणी तिचा डान्स शो याआधी बघत नव्हता आणि डान्स शोबद्दल ज्यांना माहितीही नव्हते ते सगळे आता तिचा "तो" फोटो पाहून तिच्यासाठी म्हणून हा डान्स शो बघायचे ठरवू लागले. अजून सेमी फायनलचे एपिसोड्स टेलीकास्ट होत होते. त्या डान्स प्रोग्रामची टीआरपी दोन दिवसात अचानक वाढली. प्रोड्युसरच्या हे लक्षात आले. त्याने तिला अभिनंदनाचा फोनही केला. स्वत: काहीही न करता त्या शोला आपोआप आणि परस्पर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तोही सुखावला. त्याला काही संघटनांकडून विरोधाचे, कारवाईचे आणि धमकीचे फोन आले पण तो म्हणाला, "देखो, वो सेल्फी अपलोड करना उसका पर्सनल डिसीजन है, मेरा या इस प्रोग्राम का उससे कोई लेना देना नही है!"

त्याने आधी शुटींग झालेल्या प्रोग्रामच्या सुरुवातीला खाली तशी सुचना सुद्धा द्यायला सुरुवात केली.

सगळीकडे त्या फोटोवरून न्यूज चॅनेलवर अर्ध्या अर्ध्या तासांचे प्रोग्राम तयार होऊन टेलिकास्ट व्हायला लागले.

याबाबत टिव्हीवर आणि सोशल मेडियावर फोटो बघून आणि चर्चा ऎकून बरेच लोक म्हणू लागले, "बॉस, यहीच लडकी जितना मंगता. हम इसी को वोट करेंगे!"

काही म्हणत होते, "आता अश्लीलतेकडे झुकायला लागलेत डान्स प्रोग्राम. ते आता घरच्यांसोबत बघण्याच्या लायकीचे राहिले नाहीत!"

घराघरांत, नाक्या नाक्यावर, स्कूल कॉलेजांत आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये त्या सेल्फीवरून वेगवेगळ्या गप्पा रंगू लागल्या. कमेंट्स पास होऊ लागल्यात.

कॉलेजमध्ये -

"अरे यार! काय हिरोईन दिसते ती. नक्की सुभाष भट घेईल हिला त्याच्या नव्या सेक्सी चित्रपटात! त्यात त्याचा फेवरेट हिरो 'कामरान किसमी' असेल जो तिचे चित्रपटात असंख्य किस घेईल!"

"अरे तो स्वराज कपूर जिवंत असता ना, तर त्याने हिला घेऊन 'गंगा का सुंदर समुंदर' असा मस्त चित्रपटच बनवला असता नं येड्या!"

एका घरात -

"मम्मी मम्मी, मी पण मोठेपणी सोनी बनकर होणार! खूप खूप नाचणार! नाच नाच नाचणार!"

"गप बस! बंद कर तो टिव्ही आणि चल हो घरात, अभ्यास कर! मोठं होऊन सासरी जायचंय तुला! चाल्लीय मोठी सोनी बनकर व्हायला!"

दुसरीकडे एका घरात -

"या असल्या फालतू पोरींच्या फालतू सेल्फीमुळे ज्या मुलींना खरोखर डान्स मध्ये खरोखर काहितरी करून नाव कमवायचं आहे त्या पोरी पण नाहक बदनाम होतात. कसे काय यांचे आई वडील यांना असे करू देतात, देव जाणे!"

"अहो जशी पोरं, तसेच त्यांचे आई वडिल पण! काय बोलून काही फायदा नाही! त्या कलाकार पोरी सोशल मिडीयावर फोटोत स्वत:हून जे जे दाखवतात ना, ते ते आपण आपलं डोळे उघडे ठेऊन पहात राहायचं झालं!! जे ते दाखवतील, ते ते पाहो! हा हा हा हा!!"

एका उच्चभ्रू पार्टीत -

"यार, न्यूडिटी को पता नही इंडिया मे इतना क्यों गलत तरीके से देखते हैं! लडकी को अपनी खुद की बॉडी के साथ क्या क्या करना है, क्या दिखाना है और क्या नहीं, क्या पहानना है और क्या नही ये सब दुसरे लोग कैसे डिसाईड करेंगे?

आज की महिला किसीसे न डरती है न डरेगी. ये तो बस मेल डॉमिनेटेड सोसायटी है. कोई भी लडकी अपनी कपडेवाली सेल्फी अपलोड करें या फिर बिना कपडोवाली ये सिर्फ लडकी खुद डिसाईड करेगी, न की बाकी लोग! बुलशिट मेल सोसायटी!! आय हेट डॉमिनेटींग मेल्स! ऑल मेन आर सेम!!"
 

Top